या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल -Ya Kana Kanatun



  • Title: Ya Kana Kanatun Divya Teja Prakatel
  • Genre: Bharat
  • Language: Marathi
  • Length: 4:32 minutes (4.16 MB)
  • Format: MP3 Stereo 44kHz 128Kbps (CBR)

या कणाकणातुन दिव्य तेज प्रकटेल
हे राष्ट्र पुन्हा विश्वात अजिंक्य ठरेल ॥धृ॥

श्रीराम कृष्ण आदर्श इथे अवतरले भगवान बुद्ध तीर्थंकर येथे झाले
श्रेष्ठत्व जगाने मान्य तयांचे केले ते क्षण भाग्याचे पुन्हा पुन्हा येतील ॥१॥

जाती पन्थ भाषा नको वृथा अभिमान भेदांच्या भिंती पडोत सर्व जळुन
निद्रेतुन जागा हिन्दुस्थान ते तेज जगाला निःसंशय दिपवील ॥२॥

आसाम असो पंजाब असो बंगाल तो महराष्ट्र वा कर्नाटक तामिळ
हा अखन्ड भारत परि आसेतु हिमाचल विविधतेतुनि एकता इथे प्रकटेल ॥३॥

हा समाज आपुला ध्येयापासुनि ढळला हिन्दूच हिन्दुच्या विरोधात उठलेला
परकीय शक्तिचा स्वार्थी हस्तक बनला कष्टाने आमुच्या देशभक्त होइल ॥४॥

राष्ट्राचा करण्या घात कुणी धजतील परकीय शक्तिला साथ कुणी देतील
बलदण्ड राष्ट्र त्या प्रत्युत्तर देतील हा संघ शक्तिचा साक्षात्कार घडेल ॥५॥

English Transliteration:
yā kaṇākaṇātuna divya teja prakatela
he rāṣṭra punhā viśvāta ajiṁkya ṭharela ||dhṛ||

śrīrāma kṛṣṇa ādarśa ithe avatarale bhagavāna buddha tīrthaṁkara yethe jhāle
śreṣṭhatva jagāne mānya tayāṁce kele te kṣaṇa bhāgyāce punhā punhā yetīla ||1||

jātī pantha bhāṣā nako vṛthā abhimāna bhedāṁcyā bhiṁtī paḍota sarva jaḻuna
nidretuna jāgā hindusthāna te teja jagālā niḥsaṁśaya dipavīla ||2||

āsāma aso paṁjāba aso baṁgāla to maharāṣṭra vā karnāṭaka tāmiḻa
hā akhanḍa bhārata pari āsetu himācala vividhatetuni ekatā ithe prakaṭela ||3||

hā samāja āpulā dhyeyāpāsuni ḍhaḻalā hindūca hinducyā virodhāta uṭhalelā
parakīya śakticā svārthī hastaka banalā kaṣṭāne āmucyā deśabhakta hoila ||4||

rāṣṭrācā karaṇyā ghāta kuṇī dhajatīla parakīya śaktilā sātha kuṇī detīla
baladaṇḍa rāṣṭra tyā pratyuttara detīla hā saṁgha śakticā sākṣātkāra ghaḍela ||5||


my is my

VERY VERY GOOD SONG

I'm sheockd that I found this info so easily.

very......... GOOD poem created by you

तुझ्या घरी आलो राया, तुझ्या घरी आलो राया
कृतार्थ मी झालो राया, कृतार्थ मी झालो राया ॥
तुझा लागाला मी छंद, तूच एक परमानंद
बहर लुटाया स्वच्छंद
येथवरी आलो राया, येथवरी आलो राया ॥१॥
दोन डोळियांच्या आत, तुझी प्रकाशे सन्मूर्त
ध्यास लागुनी दिनरात
भेटण्यास आलो राया, भेटण्यास आलो राया ॥२॥
नाहि मूठ रे पोह्यांची, नाहि कणी विदुराघरची
नाहि फळे त्या शबरीची
मुक्त हस्ते आलो राया, मुक्त हस्ते आलो राया ॥३॥
तुझ्या घरी श्रीरामाचा, तुझ्या लाडक्या शिवबाचा
समारंभ सद्भक्तांचा
सजविण्यास आलो राया, सजविण्यास आलो राया ॥४॥
ऐकलीस भगव्द्गीता, थोर तुक्याचीही गाथा
मीहि गीत तुझिया गीता,
गावयास आलो राया, गावयास आलो राया ॥५॥
ओवाळावि चरणी काया, शब्द तुझे जाति न वाया
तीच भावना जगवाया,
इथे लीन झालो राया, इथे लीन झालो राया ॥६॥
तुला आवडे प्राणांची, शांत शुद्ध हृत्प्रेमाची
तूपवात या देहाची,
लावण्यास आलो राया, लावण्यास आलो राया ॥७॥
तूच जीवनाचे ध्येय, तूच अंतरीचे श्रेय
प्रश्न तूच, तूच प्रमेय
मीही तूत आलो राया, मीही तूत आलो राया ॥८॥
हिंदुराष्ट्र पुरुषा राया, लीन तुझ्या झालो पाया
निर्माल्यच व्हावी काया
म्हणुनिया भुकेलो राया, म्हणुनिया भुकेलो राया ॥९॥

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options