› Geets ›Chhatrapati Shivarayancha Trivar Jayjaykar

Chhatrapati Shivarayancha Trivar Jayjaykar छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

MarathiHinduism3:18

Download MP3, 2.0 MB

The song in its original script, with the Roman reading beside it.

Original, Marathi

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार॥ध्रु॥

हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगणआई भवानी प्रसन्न होउन देई साक्षात्कार॥१॥

॥ध्रु॥ छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजाचारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार॥२॥

॥ध्रु॥ छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

स्फूर्तीकेन्द्र हे भारतियांचे दैवत अमुच्या महाराष्ट्राचेआद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार॥३॥

॥ध्रु॥ छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाचीउठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार॥४॥

॥ध्रु॥ छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

प्रभात झाली लोकशाहिची जाणिव हो कर्तव्याचीघेउ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार॥५॥

॥ध्रु॥ छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगतीपरी न शिवबासम होइल या अवनीवरती राजे छत्रपती॥६॥

॥ध्रु॥ छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

Roman reading
Roman transcription not available yet.

Spotted a mistake in these lyrics? Suggest a correction